10
10
हवाई उड्डाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.
३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांना या वर्षी पगार म्हणून ८.४३ कोटी डॉलर मिळाले आहे. विशेष म्हणजे सत्य नडेला नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते की, महिलांनी पगार वाढीची मागणी केली नाही पाहिजे. त्यांनी ‘कर्म’ करण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर यांच्या पगाराचे हे विवरण महत्वपूर्ण मानले जात आहे.
पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच डिझेल स्वस्त झालंय. केंद्रानं नियंत्रण उठविताच डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३ रुपये ३७ पैशांच्या कपातीचा निर्णय जाहीर झाला. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात स्थानिक कर अथवा व्हॅटचा समावेश नसल्यानं प्रत्यक्षातील कपात प्रतिलीटर चार रुपयांपर्यंत असेल.
पाकिस्तानच्या कारवाया अद्याप सुरूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्ताननं पुन्हा पूँछ जिल्ह्यात गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यातील हमीरपूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला.
भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय.
जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.
भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय.
कोची इथं आजपासून भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे मॅच होणार आहे. वनडे सीरिज सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचं अस्त्र उगारलंय. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या सीरिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.