इस्लामाबाद: पाकिस्तानात इमरान खानवर हल्ला झालाय. स्वतंत्रता परेड दरम्यान गुजरनवाला इथं हा हल्ला झालाय. इमरान खान हा तहरीक-ए-इंसाफचा प्रमुख असून पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आहे.
या हल्ल्यात इमरान थोडक्यात बचावले. मात्र हल्ल्यात तहरीक ए इंसाफचे चार समर्थक जखमी झालेत. दरम्यान, या घटनेनंतर गुजरावाला शहरात हिंसाचार उसळला आहे.
पाकिस्तानात सध्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात इम्रान खान यांच्या पक्षानं मोहिम उघडली आहे. निवडणुकीतील गोंधळ आणि सरकार बरखास्तीच्या मागणीसाठी, लाहोर ते इस्लामाबाद अशा मोर्चाचं आयोजन केलं होतं.
आंदोलक दोन गटात इस्लामाबादच्या दिशेनं जात होतं. एका समूहाचं नेतृत्त्व इम्रान खान आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व धार्मिक नेता ताहिर-उल-कादरी करत होते. हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारनं केल्यानंच संघर्षाची ठिणगी पडली आहे, असं बोललं जातंय.
दरम्यान, इम्रान यांच्या प्रवक्त्या अनीला खान यांनी हल्ल्यात इम्रान जखमी झालेले नाहीत, असं स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.