1993 चा ब्लॉकबस्टर, बजेट पेक्षा 7 पट अधिक कमाई, 'हा' अभिनेता झाला रातोरात स्टार

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नवीन अभिनेत्याने मोठी जोखीम पत्करून वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 12, 2025, 12:43 PM IST
1993 चा ब्लॉकबस्टर, बजेट पेक्षा 7 पट अधिक कमाई, 'हा' अभिनेता झाला रातोरात स्टार title=

1993 मध्ये अब्बास मस्तान यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील मुख्य नायकासाठी अनेक कलाकार पुढे आले होते. पण हा चित्रपट त्या काळातील नवीन अभिनेता शाहरुख खानकडे गेला. त्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे नाव आहे 'बाजीगर'. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाने त्या काळात नवीन विक्रम केला होता.

अभिनेता शाहरुख खानचा हा चित्रपट प्रेक्षक कधीच विसरु शकलेले नाहीत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका सुपरहिट झाला की याचा फायदा निर्मात्यांना तर झालाच पण त्या पेक्षा जास्त फायदा चित्रटातील मुख्य अभिनेता शाहरुख खानला झाला. 'बाजीगर' चित्रपट हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ठरला. या काळात अभिनेते नकारात्मक भूमिकेपासून दूर राहायचे. पण त्यावेळी शाहरुख खानने नकारात्मक भूमिका साकारून इतिहास रचला होता. 

नकारात्मक भूमिका साकारून बनला स्टार 

90 च्या दशकात अनेक कलाकार हे मुख्य अभिनेता म्हणून नकारात्मक भूमिका साकारण्यापासून दूर असायचे. मात्र, त्या काळात अभिनेता शाहरुख खानने ही मोठी जोखीम पत्करून रातोरात स्टार झाला. त्यावेळी अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या 'बाजीगर' चित्रपटाने करोडो रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. या चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टी या दोघींच्या नायकाची भूमिका एकट्या शाहरुख खानने केली होती. 

बदला घेण्यासाठी शाहरुख बनला खलनायक 

शाहरुख खानच्या या चित्रपटातील कथा आपल्या मृत वडील आणि भावाचा बदला घेण्यासाठी शाहरुख, काजोल आणि शिल्पा शेट्टीच्या वडिलांचे मन जिंकतो. नंतर खुर्चीवर बसतो आणि सर्वकाही त्याच्या नावावर घेतो. 'बाजीगर' चित्रपटात हिरो असणारा शाहरुख खान खलनायक बनतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्या काळातील शाहरुख खानच्या करिअरमधील हा चित्रपट सुपरहिट होता.

1993 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे बजेट फक्त 2 कोटी रुपये होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 14 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने निर्मात्यांना मालामाल केले होते. हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला होता.