भाजपमधून अटल, अडवाणी, जोशी युगाचा अंत

भारतीय जनता पक्षातून आता अटल, अडवाणी आणि जोशी युगाचा पूर्णपणे अंत झाला झाला. याचा पुरावा ही अमित शहा यांची नवी टीम आहे. या तिघांना संसदीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

PTI | Updated: Aug 26, 2014, 05:19 PM IST
भाजपमधून अटल, अडवाणी, जोशी युगाचा अंत title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातून आता अटल, अडवाणी आणि जोशी युगाचा पूर्णपणे अंत झाला झाला. याचा पुरावा ही अमित शहा यांची नवी टीम आहे. या तिघांना संसदीय समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मंगळवारी केंद्रीय संसदीय समितीची नियुक्ती केली. यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना जागा देण्यात आली नाही.

दरम्यान, वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी एका मार्गदर्शन मंडळाचीही स्थापना केली आहे. यात भाजपतील वयोवृद्ध होत चाललेल्या अटलजी, अडवाणी आणि जोशींना जागा देण्यात आली आहे. या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य गृहमंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधान मोदींनी बनविण्यात आले आहे.

भाजपची संसदीय समिती हे सर्वात मोठी संस्था आहे. संसदीय समितीत सर्व रणनिती संदर्भातील निर्णय घेतले जातात. एखाद्याला पक्षात घ्याचे किंवा काढून टाकायचे याचा निर्णय ही समिती घेते.

 

 केंद्रीय संसदीय समितीतील सदस्य:

 1.     अमित भाई शाह (अध्यक्ष)

2.     नरेंद्र मोदी (प्रधानमंत्री)

3.     राजनाथ सिंह ( गृह मंत्री)

4.     अरूण जेटली (वित्त मंत्री)

5.     सुषमा स्वराज (परराष्ट्र मंत्री)

6.     एम. व्यंकय्या नायडू ( शहरी विकास मंत्री)

7.     नितिन गडकरी (शिपिंग आणि परिवहन)

8.     अनंत कुमार  (रसायन आणि उर्वरक )

9.     थावरचंद गेहलोत ( सामाजिक न्याय आणि अधिकारिता)

10.    शिवराज सिंह चौहान (मध्यप्रदेश मुख्यमंत्री)

11.    जगत प्रकाश नड्डा  (महासचिव)

12.    रामलाल (महासचिव)

 

या संसदीय समितीची तुलना जुन्या समितीशी केल्यास तीन नाव वगळण्यात आले आणि तीन नवीन नाव जोडण्यात आले आहेत. इतर सदस्य कायम आहेत.

नव्या चेहऱ्यांमध्ये जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नाव आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.