व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हाडं आणि मेंदूवर होतो वाईट परिणाम; 'या' पदार्थांचे करा सेवन

शरीरासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक मानले जाते. शरीरातील न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेला भरुन काढण्यासाठी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यातून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होईल. 

Updated: Jan 12, 2025, 01:40 PM IST
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हाडं आणि मेंदूवर होतो वाईट परिणाम; 'या' पदार्थांचे करा सेवन title=

Foods For Vitamin B12: आपल्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक जीवनसत्त्व हे शारिरीकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे बरेच आजार जडण्याची शक्यता असते. या जीवनसत्त्वांपैकी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक मानले जाते कारण या व्हिटॅमिनमुळे विविध शारिरीक क्रियाकलाप सुरळीत करण्यासाठी मदत होते. आपले शरीर व्हिटॅमिन B12 निर्माण करत नाही, त्यामुळे आहाराद्वारे आपल्या हे जीवनसत्त्व मिळवावे लागते. शरीरातील न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेला भरुन काढण्यासाठी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यातून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होईल. 

शरीरातील व्हिटॅमिन B12 चे महत्त्व

हाडांना मजबूत बनवते

व्हिटॅमिन B12 पेशींच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरते. हे जीवनसत्त्व हाडांना मजबूत बनवते आणि तसेच यामुळे त्वचा, नखे आणि केससुद्धा मजबूत राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन B12 हाडांशी संबंधित आजारांना दूर ठेवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरते.

लाल पेशींची निर्मिती 

शरीरातील लाल पेशी (Red Blood Cells) निर्मितीमध्ये व्हिटॅमिन B12 मुख्य भूमिका बजावते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे लाल पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण न राहता अबद्ध प्रमाणात त्या तयार होतात. यामुळे मेगालोब्लास्टिक अ‍ॅनिमियाचा धोका वाढू शकतो. 

मज्जासंस्था विकसित होण्यास मदत

व्हिटॅमिन B12 मुळे मज्जासंस्था विकसित होण्यास मदत होते. या जीवनसत्त्वामुळे मेंदू प्रगल्भ होण्याससुद्धा मदत होते. गर्भधारणेच्या काळात डॉक्टर व्हिटॅमिन B12 चे स्त्रोत असणारे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन B12 ची मदत होते आणि हृदय स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहते. शरीरात योग्य प्रमाणात हे जीवनसत्त्व असल्याने हृदयरोगाच्या समस्या सुद्धा दूर राहतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर  

डोळ्यांसाठी व्हिटॅमिन B12 फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम देखील सुधारण्यास मदत होते. 

डीएनए रेप्लिकेशनच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका

व्हिटॅमिन B12 डीएनए रेप्लिकेशन (DNA Replication) च्या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डीएनए संबंधित समस्या उद्भवू शकतात. 

आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेला भरुन काढण्यासाठी काही पदार्थांचा समावेश फायदेशीर ठरु शकतो. 

  • मासे व्हिटॅमिन B12 चे उत्तम स्त्रोत आहेत. माश्यांचे सेवन केल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन B12 मिळते. 
  • अंडी, चिकन यांसारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात आढळते. 
  • दूध तसेच दूधापासून बनलेले पदार्थ जसे की दही, पनीर व्हिटॅमिन B12 चे उत्तम स्त्रोत आहेत. यामुळे शरीरात व्हिटॅमिन B12 चे प्रमाण वाढण्यास मदत होते. 
  • यासोबतच पालेभाज्या तसेच ब्रोकली सारख्या भाज्यांमधून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळते. 
  • सोयाबिन आणि ओट्स सारख्या धान्यांमुळे व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होते. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)