10

लहान मुलाने आईवरच केला चाकूने वार

पुण्यात एका १५ वर्षाच्या मुलानं आईवर चाकूनं वार केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. कारण आईनं त्याला इंटरनेटवर काम करू दिले नाही. या शुल्क कारणामुळे त्यानं हे कृत्य केल्याचं प्रथम तपासातून कळतं.

भारतात ऑक्टोबर महिन्यात आयफोन ६ लॉन्च

अॅपल कंपनीचा खूप दिवसापासून प्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन 

२०० अब्ज डॉलरपर्यंत फेसबूक

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकचे बाजार मूल्य २०० अब्ज डॉलरपर्यंत येऊन पोहचले असून यानंतर फेसबूक हे संपूर्ण जगातील २२वी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा २००.२६ अब्ज डॉलरपर्यंतचा उच्चांक कंपनीने गाठला आहे. सोमवारी कंपनीचे शेअर ७७.६ डॉलरपर्यंत झाल्याचे मीडिया रिपोर्टद्वारे सांगण्यात आले आहे.

मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

धक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं

बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं. 

'लव्ह जिहाद'चा अर्थ हिंदू मुलींना समजावून सांगा - मोहन भागवत

हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 

स्पाइसजेटनं 599 आणि 1999 रुपयांमध्ये करा विमान प्रवास

आता स्पाइसजेटनंही इतर विमान कंपन्यांसोबत स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेत भाग घेतलाय. आपल्या दोन स्लॅबमध्ये दिलेल्या स्वस्त विमान प्रवासाची योजनेची तारीख स्पाइरजेटनं वाढवून दिलीय. 

लॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

आता स्पाइसजेटनं करा 499 रुपयांत विमान प्रवास

देशातील दुसरी मोठी विमान कंपनी असलेल्या स्पाइसजेटनं स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना आजपासून सुरू केलीय. ‘अर्ली बर्ड’ अयं या योजनेचं नाव आहे. यात घरगुती शहरांमध्ये अवध्या 499 रुपयांत विमान प्रवासाचं तिकीट असेल. 

मारला असा छक्का, कॉमेन्ट्री बॉक्सचा काच चकनाचूर

झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळविला. ऑस्ट्रिलियाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या चांगलेच धुतले. त्यांचा १९८ धावांनी पराभव केला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल जॉनसनने असा छक्का मारला की बॉल सरळ कॉमेंड्री बॉक्सचा काचेला धडकला.