10
10
ग्लास्गो इथं सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत भारताचं नाव रोशन केलं असतानाच भारतीय अधिकाऱ्यांमुळं भारताची मान शरमेनं खाली गेली आहे. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कुस्तीचे पंच विरेंद्र मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात पाच नराधमांनी एका महिलेवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रिक्षेच्या बाहेर फेकून दिलं होतं.
क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.
सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शहरी भागात दुसऱ्या बँकेच्या ATMमधून महिन्याला फक्त दोन वेळा फुकटात पैसे काढता येणार आहेत. पहिले महिन्याला पाच वेळा फ्रीमध्ये कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढता येत होते. सहाव्या व्यवहारापासून (ट्रान्झॅक्शन) ग्राहकाला सेवा शुल्क द्यावे लागत होते.
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करणाऱ्या आरोपीला प्रेमानं समजावणं पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं असून त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. बहुचर्चित ज्योती खून प्रकरणातील आरोपी पियुषला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर सीओ आर.के. नायर यांनी चक्क त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हा प्रकार कॅमेरात कैद झाला होता, आणि त्यावरून सर्व स्तरांत चर्चा सुरू झाली.
केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आणि सरकारमधला दुरावा कमी करण्यासाठी एक नवं वेबपोर्टल लॉन्च केलंय. mygov.nic.in असं या वेबसाइटचं नाव आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात...
कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
'फेसबुक'वर कमेंट करणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलंय. सोशल वेबसाइटवर आक्षेपार्ह कमेंट करण्याऱ्याबद्दल आता कडक कारवाई करण्यात येते. असं असतांनाही अनेक जण आक्षेपार्ह कमेंट करत असतात.
आपात्कालीन लॅंडींगच्यावेळी तैवानमध्ये विमान अपघात झाला. या अपघातात 51 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही माहिती तैवानच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीने दिली.