health

हळदीचे गुणधर्म

रोज एक ग्रॅम हळद सेवन केली तरी त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, असे अलीकडच्या संशोधनात दिसून आले आहे. तसेच न्याहरीच्या वेळीच ही हळद घेणे आवश्यक असते, त्यामुळे मधुमेहाला आधीच्या अवस्थांमध्येच अटकाव होतो तसेच बोधनात्मक अडचणीही दूर होतात. 

Nov 27, 2014, 09:38 PM IST

चायनिज खाताय ..आधी हे वाचा....

सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Nov 26, 2014, 10:13 PM IST

थंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी

जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.

Nov 23, 2014, 08:30 PM IST

कोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक

पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला  निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं. 

Nov 13, 2014, 04:34 PM IST

तुम्हीही जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर...

गरम गरम पदार्थ खाणं कुणाला आवडतं नाही... पण, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर सावधान!

Nov 12, 2014, 06:47 PM IST

राज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश

अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.

Nov 8, 2014, 07:42 AM IST

डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा

राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Nov 7, 2014, 07:48 AM IST

आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी...

 आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी. नरकचतुर्दशीला पार पडलं पहिलं अभ्यंगस्नान. फटाके फोडत आनंदोत्सव  आज साजरा कऱण्यात येत आहे. 

Oct 22, 2014, 08:33 AM IST

'राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?'

'राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?'

Oct 1, 2014, 03:04 PM IST

"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?"

 शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केलेल्या फोनविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी राज ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते मुंबईत परतले होते.

Oct 1, 2014, 01:30 PM IST

मुंबईकरांनो अशा तापमानात आरोग्य सांभाळा

मुंबईकरांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सप्टेंबर महिन्यात जोरदार उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईचा पारा ३७ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलाय. यामुळे कोणत्याही कामासाठी बाहेर पडतांना काळजी घ्यावी. सोबत पाणी आणि डोक्यावर टोपी आणि रूमाल, तसेच महिलांनी स्कार्प घेतला तर सर्वोत्तम.

Sep 30, 2014, 10:48 AM IST

पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

दिवसभरात तुम्ही किती पाणी पितात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणं कधीही योग्य असल्याचं सांगितलं जातं, यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही.

Sep 17, 2014, 04:07 PM IST

शेंगदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर

शेंगदाणा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अतिप्रमाणात खाणे टाळणे कधीही चांगलं. शेंगदाण्यात प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.

Sep 15, 2014, 05:57 PM IST

लठ्ठपणा कमी करायचाय तर मेट्रोनं प्रवास करा!

आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा. 

Aug 24, 2014, 04:15 PM IST