राज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश

अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.

Updated: Nov 8, 2014, 08:04 AM IST
राज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश title=

मुंबई : अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप न झालेली खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. त्यामध्ये आरोग्य विभाग हे खातेही आहे. त्यामुळे अनेक खात्यांचा भार त्यांना स्वत:च्या जबाबदारीवर सांभाळावा लागत आहे. डेंग्यूमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यत्र्यांनी या बैठकीत राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

डेंग्यूने राज्याला हैराण करुन सोडले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात डेंग्यू रुग्णांच्या बळींची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले आहेत. मुंबईत धूर आणि औषध फवारणीनंतरही डेंग्यूचा कहर कायम असल्याने आरोग्य यंत्रणा बिन कामाची असल्याची दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत डेंग्यूची संख्या वाढत आहेत. यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे.

सरकारी आकडेवारीनुसार डेंग्यूचे रुग्ण
मुंबई - ६५९, पुणे - १२७, नाशिक - १२९, पुणे - १२७, सोलापूर - १०४, अहमदनगर -१०१, बीड - २३६, नागपूर-२०२, धुळे - १८२, रत्नागिरी ७२, रायगड -०६.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.