चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा, दुखापतग्रस्त खेळाडूलाही दिली संधी, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व

Champions Trophy 2025 : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची 8 संघांमध्ये चुरस रंगणार आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 13, 2025, 12:35 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा, दुखापतग्रस्त खेळाडूलाही दिली संधी, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व  title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 12 जानेवारी पर्यंत आपले संघ जाहीर करण्यास सांगितले होते. त्यानुसार ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champians Trophy 2025) साठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. 2017 नंतर आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची 8 संघांमध्ये चुरस रंगणार आहे. 

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डाने एकापेक्षा एक खेळाडूंची निवड केली आहे. परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही की संघाचे नेतृत्व सध्या दुखापतग्रस्त असलेल्या पॅट कमिन्सकडे देण्यात आले आहे. पॅट कमिन्सला बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2023 चा आयसीसी वनडे वर्ल्ड कप, 2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. 

दिग्गज खेळाडूंसह युवा स्टार खेळाडूंचाही समावेश : 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे दोघे ओपनिंग करताना दिसू शकतात. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं चांगलं कॉम्बिनेश आहे. तर ॲरॉन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श हे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये गेमचेंजर ठरू शकतात. तर वेगवान गोलंदाजीची धुरा पॅट कमिन्स मिचेल स्टार्क, नाथन एलिस, जोश हेजलवुड सारख्या खेळाडूंच्या खांद्यावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया बी ग्रुपमध्ये असून त्यांच्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्व ग्रुप स्टेज सामने हे पाकिस्तानात खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया श्रीलंकेसोबत दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. 

हेही वाचा : IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :

पॅट कमिंस (कर्णधार), एलेक्स कॅरी, नाथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, मैथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, एडम जाम्पा.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केव्हा जाहीर होणार भारतीय संघ?

 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या 19 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर याचा शेवटचा सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 12 जानेवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आलेली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे ही मुदत वाढवून मागितली असून राजीव शुक्ला यांच्या माहितीनुसार बीसीसीआय 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करेल.