थंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी

जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.

Updated: Nov 23, 2014, 08:30 PM IST
थंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी title=

मुंबई : जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.
सनस्क्रीनला विसरू नका : आतापर्यंत तुम्हा सगळय़ांच्या हे लक्षात आलेच असेल की सनस्क्रीन थंडीच्या महिन्यांमध्येही आणि घरात आणि घराबाहेरही आवश्यक असते. ३० एसपीएफपेक्षा अधिक क्षमतेची कोणतीही उत्पादने वापरता येतील.

फेशिअल्स, क्लिनअप्स : नियमितपणे फेशिअल्स केल्यास त्वचा वातावरण बदलांसाठी तयार होते. आरोग्यदायी त्वचेसाठी ही योग्य पायाभरणी आहे. उन्हाळा संपता संपता त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यासाठी आणि मसाजच्या माध्यमातून त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी हायड्रेटिंग फेशिअल करून घेणे गरजेचे आहे.

स्कीन केअर उत्पादने : ही सगळय़ात महत्त्वाची पायरी आहे. क्लिन्झरपासून डे आणि नाइट क्रीमपर्यंत.. ऋतू बदलला किंवा तुम्ही वेगळय़ाच ठिकाणी प्रवासाला जात असाल तर यातील प्रत्येक वस्तू बदलते. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी कोणती उत्पादने योग्य आहेत, हे जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांना भेटा. ऋतूप्रमाणे स्कीन केअर उत्पादने बदलतात. इतकेच नाही तर तुम्ही कोणत्या शहरात आणि देशात राहात आहात, यावरही ती अवलंबून असतात.

मेकअप आणि सौंदर्यप्रसाधने : त्वचेसाठीच्या उत्पादनांप्रमाणेच मेकअपचे साहित्यही बऱ्याचअंशी ऋतूवर अवलंबून असते. हिवाळा म्हणजे अधिक माइश्चराइज्ड आणि क्रीम बेस्ड मेकअपचा काळ, तर उन्हाळा म्हणजे मिनरल मेकअप आणि पाण्याने वाहून न जाणारा मेकअप वापरण्याचा काळ.

हातापायांचे लाड करा : हातापायांसाठी असलेले खास क्रीम वापरा, ग्लोव्हज् आणि सॉक्स घाला आणि नियमितपणे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घ्या.

बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करू नका : थंडीच्या दिवसांत आपण सगळेच गरम पाण्याने सुखावतो. मात्र गरम पाण्यामुळे त्वचेवरील नसíगक घटक निघून जातात, ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी बनत जाते, हे लक्षात ठेवा. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा आणि थोडक्यात आंघोळ आवरा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.