लंडन: आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा.
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार खाजगी वाहनाऐवजी सार्वजनिक परिवहनाचा वापर करणारी व्यक्ती कमी चरबीची असते. सार्वजनिक वाहनानं प्रवास करणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा कमी असतो.
लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि लंडन कॉलेज विश्वविद्यालयानं सक्रीय वाहतूक आणि लठ्ठपणा इंडेक्स या दोन मुख्य तत्त्वांनुसार बॉडी मास इंडेक्स आणि पर्सेंटेज बॉडी फॅट दरम्यानच्या संबंधाची गणना करून अभ्यास केला.
ब्रिटिश मेडिकल जर्नल या शोध पत्रिकेत छापलेल्या अहवालानुसार पायी चालणं, सायकल चालवणारे आणि सार्वजनिक परिवहनाचा वापर करणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.