BCCI Meeting : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यावर मुंबईत शुक्रवारी बीसीसीआयची रिव्ह्यू मिटिंग पारपडली. या मिटिंगमध्ये विविध विषयांसह रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबाबत देखील चर्चा करण्यात आली. टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे (Team India) जवळपास सर्वच फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत, अशा स्थितीत युवा खेळाडूंसह दिग्गज खेळाडूंनी देखील रणजी ट्रॉफी सामने खेळावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर विराट आणि रोहित हे दोघे रणजी ट्रॉफीचे सामने खेळताना दिसू शकतात.
कर्णधार रोहित शर्माने 2015 मध्ये मुंबई संघातून रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता. तसेच 2018 पासून तो देशांतर्गत क्रिकेटपासून दूर आहे. तर विराट कोहलीने नोव्हेंबर 2012 नंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळलेला नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेवटचा सामना हा 2013 मध्ये खेळला होता. पीटीआयच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले होते. बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं की ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे आहे त्यांनी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणे महत्वाचे आहे. रेड बॉल टूर्नामेंट 23 जानेवारी पासून सुरु होणार आहे, तर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारी पासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तेव्हा या सीरिजपूर्वी विराट आणि रोहित कमीत कमी एक रणजी ट्रॉफी सामना खेळू शकतात.
हेही वाचा : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? स्टार गोलंदाजाच्या हेल्दबाबत आली मोठी अपडेट
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलीया विरुद्ध सीरिजच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकल्यावर विराटने 5 सामन्यात फक्त 190 धावा केल्या. तर रोहित शर्माने 3 सामन्यात 31 धावा केल्या होत्या. पीटीआयच्या रिपोर्टनुसार खेळाडू द्विपक्षीय सीरिज निवडू आणि सोडू शकणार नाहीत. त्यांना सीरिज सोडण्यासाठी व्हॅलिड मेडिकल रिपोर्ट द्यावं लागेल. अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी याआधी द्विपक्षीय मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि स्वत:च्या इच्छेनुसार विश्रांती घेतली होती. मात्र आता तसे चालणार नाही.