चायनिज खाताय ..आधी हे वाचा....

सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Updated: Nov 26, 2014, 10:22 PM IST
चायनिज खाताय ..आधी हे वाचा.... title=

मुंबई : सध्या चायनिज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचं म्हटलं की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

आपल्याला चायनिज गोष्टींचं आकर्षण पहिल्यापासूनच आहे. अगदी चिनी बनावटीच्या वस्तूंपासून चायनिज पदार्थांपर्यंत. चायनिज पदार्थांची तर सध्या सर्वांनाच चटक लागली आहे. चीनमध्ये मिळणारे चायनिज पदार्थ आणि भारतात मिळणारे चायनिज पदार्थ यात फरक आहे. भारतीयांच्या जिभेला पूरक ठरतील, अशा चवीचे हे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळं तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे, तर त्यांचे 'कुक' अनेक तडजोडी करतात. त्यात निकृष्ट दर्जाचं तेल आणि भाज्या वापरल्या जातात. त्याहीपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

चायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळं पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरुम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे 'स्टेपल फूड' आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्धकच्चे शिजवले गेले तर पचायला हानीकारक आहेत. शिवाय मैदा आतडय़ात जाऊन चिकटत असल्यामुळं त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. 'रोडसाइड चायनिज फूड'मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्यानं पचनसंस्थेसाठी हितकर नसतो. 

चायनिज पदार्थाना चव आणणाऱ्या अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट)च्या अतिरिक्त वापरामुळं या पदार्थाचं सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असं आढळून आलं आहे.'अजिनोमोटो' नावाची कंपनी तयार करीत असलेल्या 'फ्लेव्हर एन्हान्सर'चे शास्त्रीय नाव 'मोनोसोडियम ग्लुटामेट' असून त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्यं असतात.  व्हिनेगरप्रमाणंच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. अनेक भाज्या, सॉसेस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रीतीनं मिसळू शकतो, पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र पदार्थाची चवच बिघडतं असं नाही, तर खाणाऱ्यांचं आरोग्यही बिघडू शकतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.