"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?"

 शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केलेल्या फोनविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी राज ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते मुंबईत परतले होते.

Updated: Oct 1, 2014, 04:31 PM IST
"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?" title=

मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केलेल्या फोनविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी राज ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते मुंबईत परतले होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे यांना फोन केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होती, तुम्ही राज यांना फोन केला होता का?, असं उद्धव ठाकरे यांना एका पत्रकाराने विचारल्यावर,  "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". असा सवाल केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.