कोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक

पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला  निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं. 

PTI | Updated: Nov 13, 2014, 04:43 PM IST
कोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक title=

नवी दिल्ली: पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला  निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं. 

कोबीत असलेले काही घटक शरीरात असलेल्या विषारी पदार्थांना शरीराबाहेर फेकून पचनक्रीडा म्हणजेच मेटाबॉलिझमला नियमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ताजा कोबीचे बारिक-बारीक तुकडे करून त्यात मीठ, काळीमिर्ची आणि लिंबाचा रस टाकून रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यानं  2-4 आठवड्यात बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

ताज्या कोबीच्या रसात व्हिटॅमिन यू नावाचं एक असं दुर्मिळ व्हिटॅमिन सापडतं. जे अल्सर प्रतिरोधी म्हणून खूप गुणकारी आहे. कोबीचा रस प्यायल्यानं पेप्टिक अल्सर म्हणजे पोटाच्या जखमा ठीक होतात. व्हिटॅमिन 'यू' चं 'यू' हे अक्षर लॅटिन भाषेत यूलस असा लिहिला गेलाय, ज्याचा अर्थ अल्सर असा होतो. जर दररोज सकाळी-संध्याकाळी एक-एक कप ताजा कोबीचा रस पिल्यानं अल्सर सारखा आजार दुरुस्त होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.