24taas

निर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला

दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.  

Mar 5, 2015, 07:07 PM IST

आता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

दिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.

Mar 5, 2015, 06:21 PM IST

व्हि़डिओ: इमरान हाश्मीच्या 'Mr X'चा ट्रेलर रिलीज

विक्रम भट्ट पुन्हा एकदा ३डी फिल्म 'Mr X'घेऊन तयार आहेत. चित्रपटात इमरान हाश्मी सोबत अमायरा दस्तूर रोमांस करतांना दिसेल. चित्रपट येत्या १७ एप्रिलला रिलीज होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.

Mar 5, 2015, 05:47 PM IST

मुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?

पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?

Mar 5, 2015, 04:31 PM IST

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

 दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.

Mar 5, 2015, 01:06 PM IST

अण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये. 

Mar 4, 2015, 08:16 PM IST

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात होणार सुधारणा

लवकरच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांनाही गर्भपात करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं समजतं. केंद्र सरकारनं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे एमटीपी कायद्यात सुधारणा करण्याचं ठरवलंय. त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल सुचवण्यात आलेत. 

Mar 4, 2015, 08:03 PM IST

टर्किश एअरलाइनचं विमान रनवेवर घसरलं, २३८ जण सुरक्षित

काठमांडू इथं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळं अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे हे विमान दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Mar 4, 2015, 06:41 PM IST

गर्भावस्थेदरम्यान ४०% भारतीय महिलांचं वजन सामान्यपेक्षा कमी

भारतीय महिला जेव्हा गर्भावस्थेत असतात, तेव्हा त्यातील ४० टक्के महिलांचं सामान्यपेक्षा कमी वजन असतं, असं एका अभ्यासात पुढे आलंय. जेव्हा की भारतापेक्षा आफ्रिकेत अधिक निर्धन लोक आणि जास्त प्रजनन दर आहे. तरी तिथल्या केवळ १६.५ टक्के गर्भवती महिलांच्या वजनाची टक्केवारी सामान्यपेक्षा कमी आहे. 

Mar 4, 2015, 05:53 PM IST

रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

Mar 4, 2015, 03:02 PM IST

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवींची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

लाचघेतांना रंगेहाथ पकडल्यानंतरही आपल्या पदाला चिकटून बसलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. काल माळवींचा ताफा कार्यकर्त्यांकडून अडविण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली. पण त्यांनी काही महापौरपदाचा राजीनामा दिला नाही.

Mar 4, 2015, 01:45 PM IST

आरे कॉलनीत पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्याची घटना घडलीय. सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचं अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केलं होतं. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

Mar 3, 2015, 04:33 PM IST

काँग्रेस युवराजांचा बंगळुरूत होणार राज्याभिषेक - सूत्र

काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळुरूमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 10-11 एप्रिलला एआयसीसीची बंगळुरूत बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

Mar 3, 2015, 03:57 PM IST

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ख्रिस गेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

होळीच्या दिवशी भारतासाठी आणखी एक सुखद धक्का असू शकतो. तो म्हणजे वेस्ट इंडिजचं वादळ ख्रिस गेल याच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं भारतासाठी 'मौका-मौका' असेल. 

Mar 3, 2015, 03:35 PM IST