नवी दिल्ली: काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळुरूमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 10-11 एप्रिलला एआयसीसीची बंगळुरूत बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये एप्रिलमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार असून राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. तसंच सोनिया गांधींना संसदीय पक्षाच्या नेत्या बनवलं जाऊ शकतं. नजिकच्या काळात झालेल्या प्रदेशाध्यक्षांच्या घोषणा या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जातयं.
अशोक चव्हाण, संजय निरुपम, अजय माकन या राहुल ब्रिगेडमधल्या नेत्यांना संधी देण्यात आलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.