निर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला

दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.  

Updated: Mar 5, 2015, 08:40 PM IST
निर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला  title=

नवी दिल्ली: दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय. बुधवारी उशीरा रात्री ब्रिटनमध्ये बीबीसीनं ही डॉक्युमेंट्री दाखवली होती आणि आज काही जणांनी ती यु-ट्यूबवर अपलोड केली. यानंतर भारत सरकारनं यु-ट्यूबवरून डॉक्युमेंट्री काढण्यास सांगितलं. त्यानंतर आता ही डॉक्युमेंट्री काढण्यात आलीय.

भारतात डॉक्युमेंट्रीवर बॅन करण्याचा निर्णय दिल्ली कोर्टानं कायम ठेवलाय. कोर्टानं डॉक्युमेंट्रीच्या इंटरनेटवरील प्रसारणावरही बॅन लावलाय.

गृहमंत्रालयासोबत आपल्या चर्चेत बीबीसीनं सांगितलं की, सरकारच्या आदेशाला लक्षात ठेवून ते भारतात डॉक्युमेंट्री आणि गँगरेपचा आरोपी मुकेश सिंहचा इंटरव्ह्यूचं प्रसारण करणार नाही. बीबीसीनं सांगितलं की, त्यांनी ब्रिटनमध्ये स्थानीक वेळेनुसार रात्री १० वाजता ही डॉक्युमेंट्री दाखवली. विशेष म्हणजे डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणानंतर ती इंटरनेटवरही अपलोड केली गेली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.