भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ख्रिस गेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

होळीच्या दिवशी भारतासाठी आणखी एक सुखद धक्का असू शकतो. तो म्हणजे वेस्ट इंडिजचं वादळ ख्रिस गेल याच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं भारतासाठी 'मौका-मौका' असेल. 

Updated: Mar 3, 2015, 03:35 PM IST
भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ख्रिस गेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह title=

पर्थ: होळीच्या दिवशी भारतासाठी आणखी एक सुखद धक्का असू शकतो. तो म्हणजे वेस्ट इंडिजचं वादळ ख्रिस गेल याच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं भारतासाठी 'मौका-मौका' असेल. 

आज प्रॅक्टिस दरम्यान गेलला पुन्हा समस्या उद्भवलीय. वेस्ट इंडिज टीम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ख्रिस गेलला चांगलीच दुखापत झालीय. त्यामुळं कदाचित तो शुक्रवारी भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार नाही. 

मागील अनेक काळापासून वेस्ट इंडिज या तडाकेबाज बॅट्समनला बॅक पेनिंगचा त्रास होतोय. जेव्हा आज टीमचे मेंबर्स प्रॅक्टीस करत होते, तेव्हा गेल सिलेक्शन कमिटीसोबत चर्चा करत होता. 

वेस्ट इंडिज टीम अजून क्वाटर फायनलमध्ये पोहोचली नाहीय. त्यामुळं धोनीच्या टीमशी लढण्यासाठी वेस्ट इंडिज टीममध्ये गेल असणं टीमसाठी आवश्यक आहे. त्यामुळं आता लवकरच कळेल की, होळी टीम इंडियासाठी चांगली असेल की, वेस्ट इंडिजला क्वाटर फायनलमध्ये जागा मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.