IPL 2025 Schedule: आयपीएलच्या मेगा लिलावासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. सर्व 10 संघ आपली टीम तयार करण्यासाठी एकाच ठिकाणी जमणार आहे. यावेळी लिलावात 641.5 कोटी रुपये पणाला लागले आहेत. सर्व संघांचे बजेट 120 कोटी रुपये करण्यात आले असून खेळाडूंसाठी किमान आधारभूत किंमत 20 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या मेगा लिलावा संधर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावांसह एकूण ५७७ खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले आहे. या यादीत 367 भारतीय आणि 210 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. सर्व दहा फ्रँचायझींनी मिळून एकूण 46 खेळाडूंना रिटेन केले आहे अर्थात कायम ठेवले आहे.
हे ही वाचा: एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!
IPL गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलाव अधिक रंजक करण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. एकूण 204 जागा आता रिक्त आहेत. दोन दिवसांत हे स्लॉट भरले जातील आणि त्यापैकी 70 परदेशी खेळाडूंसाठी असू शकतात. 2 कोटी रुपयांच्या टॉप बेस प्राईसमध्ये 82 खेळाडू आहेत. तर 27 क्रिकेटपटूंनी त्यांची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवली आहे. 1.25 कोटींच्या मूळ किमतीत 18 खेळाडूंचा समावेश आहे.
हे ही वाचा: IPL 2025 पूर्वी, BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'हा' महत्त्वपूर्ण नियम केला रद्द
CAN. NOT. WAIT
We are less than 24 hours away from the #TATAIPL Mega Auction #TATAIPLAuction pic.twitter.com/ej2kJdL3rw
— IndianPremierLeague (@IPL) November 23, 2024
CSK: 20 स्लॉट (7 विदेशी)
RCB: 22 स्लॉट (8 विदेशी)
SRH: 20 स्लॉट (5 विदेशी)
MI: 20 स्लॉट (8 विदेशी)
DC: 21 स्लॉट (7 विदेशी)
RR: 19 स्लॉट (7 विदेशी)
PBKS: 23 स्लॉट (8 विदेशी)
KKR: 19 स्लॉट (6 विदेशी)
GT: 20 स्लॉट (7 विदेशी)
LSG: 20 स्लॉट (7 विदेशी)
हे ही वाचा: IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील
पंजाब किंग्स - 110.5 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 83 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स – 73 कोटी रुपये
गुजरात टायटन्स – 69 कोटी रुपये
लखनौ सुपर जायंट्स – 69 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्ज - 55 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स – 45 कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स – 51 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद – 45 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स – 41 कोटी रुपये.