24taas

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू

भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.  

Feb 20, 2015, 11:39 AM IST

दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक!

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता. 

Feb 20, 2015, 09:37 AM IST

धक्कादायक: दारुड्या पतीनं पत्नी आणि मुलीला पेटविलं

क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून दारुड्या पतीनं आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीला पेटविल्याची धक्कादायक घटना वांद्रे खेरवाडी या ठिकाणी घडली. या घटनेत दोघी ८० ते १०० टक्के भाजल्या असून त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Feb 20, 2015, 08:40 AM IST

पेट्रोलियम मंत्रालयातून कागदपत्र लीक, रिलायंसचे ५ जण अटकेत

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केलीय.  

Feb 20, 2015, 08:24 AM IST

मुख्यमंत्र्यांचा दणका, PWDचे १७ अभियंते निलंबित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांना चांगलाच दणका दिलाय. मुंबईच्या १३ आणि नाशिकमधील ४ अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलंय. 

Feb 19, 2015, 03:44 PM IST

... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण

नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय. 

Feb 19, 2015, 02:56 PM IST

पुढील वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी- शिवसेना

पुढल्या वर्षीपासून शासकीय शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरी केली जावी अशी मागणी शिवसेनेनं केलीये. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिलीये. आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तशी मागणी केल्याचं ते म्हणाले. 

Feb 19, 2015, 11:15 AM IST

'UAE'चा विकेट किपर पालघरचा मराठमोळा स्वप्नील पाटील

आज वर्ल्डकपमध्ये मॅच आहे ती यूएई आणि झिम्बाब्वेच्या टीममध्ये. याच यूएई म्हणजे संयुक्त अरब अमितातच्या टीमचा विकेट किपर आहे मराठमोळा स्वप्नील पाटील. स्वप्नील मूळचा पालघरचा आहे.

Feb 19, 2015, 10:30 AM IST