राळेगणसिद्धी: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये.
२५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ही धमकी मिळालीये. अशोक गौतम यांच्या तक्रारीवरुन पंजाबच्या पठाणकोटचा मूळ रहिवासी असलेल्या गगन विधू याच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
अण्णा हजारे हे महात्मा गांधींप्रमाणे प्रमाणे अरविंद केजरीवाल यांना पुढे करीत आहेत. मी लवकरच भारतात परत येत असून बंदुकीची व्यवस्था करून आधुनिक गांधींना शूट करेन. मी केजरीवालचा द्वेष करतो, असही गगननं धमकीत म्हटलंय.
दरम्यान, अण्णांना झेड दर्जाची सुरक्षा यापूर्वीच देण्यात आलेली आहे. धमकीनंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.