मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात होणार सुधारणा

लवकरच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांनाही गर्भपात करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं समजतं. केंद्र सरकारनं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे एमटीपी कायद्यात सुधारणा करण्याचं ठरवलंय. त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल सुचवण्यात आलेत. 

Updated: Mar 4, 2015, 08:03 PM IST
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात होणार सुधारणा title=

मुंबई: लवकरच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांनाही गर्भपात करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं समजतं. केंद्र सरकारनं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे एमटीपी कायद्यात सुधारणा करण्याचं ठरवलंय. त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल सुचवण्यात आलेत. 

लवकरच हे विधेयक मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळापुढं येणार आहे. गर्भपातासंदर्भात कायद्यात नेमक्या काय सुधारणा करण्यात येणार आहेत, ते पाहूयात...

काय आहेत नव्या सुधारणा?

१. केंद्र सरकार नवं वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक मांडणार
२. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, आयुष डॉक्टरांनाही गर्भपात करण्याचे अधिकार
३. गरोदरपणाच्या २४ आठवड्यापर्यंत यापुढे गर्भपात करता येणार
४. सध्या गर्भपात करण्याची मुदत २० आठवड्यापर्यंतच
५. विधेयकाचा आराखडा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी मांडणार

बेकायदा गर्भपाताचे प्रमाण ५० टक्के?

१. जगभरात दरवर्षी २२ दशलक्ष असुरक्षित गर्भपात होतात
२. भारतामध्ये गर्भपाताचे प्रमाण वर्षाला ७ दशलक्ष एवढे आहे
३. भारतातील जवळपास ५० टक्के गर्भपात बेकायदेशीररित्या होतात
४. बेकायदा गर्भपातांमुळे गरोदर महिलांचे जीव धोक्यात
५. बेकायदा गर्भपातामुळे बाळंतपणात मृत्यूचे प्रमाण ८ टक्क्यांवर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.