24taas

प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवणारं आयवॉच लवकरच भारतात लॉन्च!

सध्या जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळीचं लक्ष लागलंय ते अॅपलच्या आयवॉचकडं... अॅपल पहिल्यांदाच स्मार्ट वॉच लाँच करतंय... त्यामुळं तमाम गॅझेटप्रेमींच्या डोक्यात सध्या हीच एक टिकटिक वाजतेय... आणि त्यांच्या काळजाची धडधडही वाढलीय...

Mar 9, 2015, 07:16 PM IST

नॅशनल पार्कमध्ये माकडांचा रहस्यमय मृत्यू, माकडांचे डोळे गायब

मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये माकडांच्या रहस्यमय मृत्यूमुळं एकच खळबळ उडालीय. आतापर्यंत ७ माकडांचे मृतदेह सापडले असून, त्या सातही माकडांचे डोळे गायब असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातयं.

Mar 9, 2015, 06:44 PM IST

स्वस्थ आहार निवडा आणि स्वाइन फ्ल्यूपासून दूर राहा

देशात झपाट्यानं वाढत असलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या पाहता आहारतज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या बाबी सुचवल्या आहेत. जर आपल्या आहारात या खाद्यपदार्थांचा समावेश केला तर स्वाइन फ्ल्यूच्या संक्रमणापासून आपण बचाव करू शकतो. स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत देशात ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

Mar 9, 2015, 06:04 PM IST

आमिरनंतर आता हृतिक रोशन होणार न्यूड?

आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल. 

Mar 9, 2015, 05:08 PM IST

आलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान

देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Mar 9, 2015, 03:54 PM IST

सरकारनं माझ्यावर उपकार केले नाही - मसरत आलम

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारनं माझ्यावर उपकार केलेले नाहीत, असं विधान करत आलमनं आगीत तेल ओतलं आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणं आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

Mar 8, 2015, 10:34 PM IST

दुसरीही मुलगी झाली म्हणून बाळंतीणीला ३ दिवस डांबून मारहाण

एकीकडे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील एका  बाळंतीणीच्या शोषणाचा  धक्कादायक  प्रकार उघडकीस आला आहे. 

Mar 8, 2015, 10:05 PM IST

भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार पवन सिंहच्या पत्नीची आत्महत्या

भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह याची पत्नी नीलम सिंहने आज आत्महत्या केलीय. २१ वर्षीय नीलमचं तीन महिन्यांपूर्वी पवनसोबत लग्न झालं होतं. नीलमच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप पोलिसांना कळलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी कोणतंही सुसाइड नोट सापडलं नाही. 

Mar 8, 2015, 08:09 PM IST

नव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.

Mar 8, 2015, 07:39 PM IST

लोकप्रिय 'नोकिया ११००' येतोय नव्या अवतारात

जगातिल सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हँडसेट नोकिया ११०० पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च होऊ शकतो. बेंचमार्कची टेस्ट रिपोर्ट लीक झाल्यानं माहिती मिळालीय की, अँड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टिमसह नोकिया ११०० बाजारात येऊ शकतो. 

Mar 8, 2015, 07:00 PM IST

सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक

जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.

Mar 8, 2015, 05:56 PM IST

शोएब भाईचा सल्ला उपयोगी पडला: मोहम्मद शमी

बॉलिंगमध्ये गति मिळण्याचं श्रेय शोएब अख्तरला देत भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं म्हटलं की, पाकिस्तानच्या या दिग्गज बॉलरनं त्याला रन अप छोटा घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळं त्याला आपली गति वाढनिण्यासाठी मदत मिळाली. 

Mar 8, 2015, 04:12 PM IST