24taas

आनंदाची बातमी: आता ट्विटरवरून शोधा नोकरी!

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरत रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ७७ टक्के ट्विटर ग्राहकांचं म्हणणं आहे की, या प्लॅटफॉर्मवरून त्यांना रोजगार शोधण्याची संधी मिळावी. 

Feb 25, 2015, 06:45 PM IST

मानसिक आजारांपासून वाचण्यासाठी वेळेवर करा जेवण

आपलं शरीर हे एक असं मशीन आहे, जे खूप संतुलित काम करतं. वेळेवर जेवण आणि झोपल्यानं आपलं जीवनच चांगलं होत नाही तर आपण मानसिक विकारांपासूनही दूर राहू शकतो.  सरकाडियन रिदम्स (शरीरात असलेलं जैविक घड्याळ) २४ तासांच्या चक्राचं पालन करतं आणि हार्मोन किंवा स्वभावासह शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते.

Feb 25, 2015, 06:03 PM IST

रेल्वे बजेट २०१५: महिला डब्यातील भांडणं संपतील?

मुंबई लोकल रेल्वेचे महिला डबे महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी जागा ठरलीय. विशेषतः मध्य रेल्वेवरच्या गाड्यांमधली स्थिती फारच चिंताजनक आहे. म्हणून या महिला प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत. 

Feb 25, 2015, 04:03 PM IST

पोळ यांची बदली प्लँचेटमुळेच, अजित पवारांचा गौप्यस्फोट

सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क प्लँचेटची मदत घेतली होती, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. म्हणूनच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली करण्यात आल्याची कबुलीही अजितदादांनी दिलीय.

Feb 25, 2015, 03:29 PM IST

वर्ल्डकप २०१५: भारताच्या बॅटनेच गेलचं वादळ!

क्रिस गेलच्या ज्या खेळीची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे. मात्र गेलच्या या खेळीचा भारताशी असलेला एक संबंध समोर आलाय. गेलनं काल १६ षटकार आणि १० चौकार मारून क्रिकेट वर्ल्डकपमधील पहिली डबल सेंच्युरी केलीय.

Feb 25, 2015, 02:56 PM IST

प्रदीप जैन हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप

गँगस्टर अबू सालेमला मुंबईच्या विशेष टाडा कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरणी कोर्टानं ही शिक्षा सुनावली. 

Feb 25, 2015, 12:49 PM IST

'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा

संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.  

Feb 25, 2015, 12:17 PM IST

इंधर दर कमी झाले, प्रवासी वाहतूक दर कधी- भाजपची मागणी

देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं आता रिक्षा, प्रवासी वाहतूक सांधनांचे दरही कमी करावे, अशी मागणी भाजपनं परिवहन मंत्र्याकडे केलीय. त्यासंबंधीचं पत्रच त्यांनी दिवाकर रावते यांना दिलंय.

Feb 20, 2015, 04:13 PM IST

बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!

आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.

Feb 20, 2015, 02:54 PM IST