कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवींची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

लाचघेतांना रंगेहाथ पकडल्यानंतरही आपल्या पदाला चिकटून बसलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. काल माळवींचा ताफा कार्यकर्त्यांकडून अडविण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली. पण त्यांनी काही महापौरपदाचा राजीनामा दिला नाही.

Updated: Mar 4, 2015, 01:45 PM IST
कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवींची राष्ट्रवादीतून हकालपट्टी  title=

कोल्हापूर: लाचघेतांना रंगेहाथ पकडल्यानंतरही आपल्या पदाला चिकटून बसलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. काल माळवींचा ताफा कार्यकर्त्यांकडून अडविण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली. पण त्यांनी काही महापौरपदाचा राजीनामा दिला नाही.

कोल्हापूर पालिकेनं मालकीहक्क सोडलेली जमीन मूळ मालकाच्या नावे करण्यासाठी, १६ हजारांची लाच मागितल्याचा आरोप तृप्ती माळवी यांच्यावर आहे. माळवी यांना ही रक्कम घेताना रंगेहाथ अटकही झाली होती. महिनाभरापूर्वी ही कारवाई झाली होती.
 
पण अटक टाळण्यासाठी त्यांनी रुग्णालय गाठलं. मात्र अटकपूर्व जामीन फेटळाल्यानं त्या एसीबी कार्यालयात हजर राहिल्या आणि त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका झाली. 

पालिकेच्या महासभेत त्या राजीनामा देतील, अशी आशा असतांना. त्यांनी महासभेलाही दांडी मारली. अखेर तृप्ती माळवी राजीनामा देत नसल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.