24taas

एक्स्लुझिव्ह: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून उकळले १० लाख रुपये

रेल्वे भरती फसवणूक प्रकरणामध्ये पालकांकडून पैसे उकळणाऱ्या शिवाजी केरेची एक व्हिडिओ क्लिप झी मीडियाच्या हाती आली आहे. या व्हिडिओमध्ये केरे पालकांकडून पैसे घेताना स्पष्ट दिसतोय.

Mar 18, 2015, 05:10 PM IST

फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील.  देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

Mar 18, 2015, 10:39 AM IST

गुड न्यूज: हमारा बजाज परत येतेय... चेतक पुन्हा रस्त्यावर धावणार

हमारा बजाज...हमारा बजाज... हे एकेकाळी अतिशय लोकप्रिय झालेल्या जाहिरातीचे जिंगल पुन्हा एकदा कानी पडणार आहे.

Mar 17, 2015, 05:11 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Mar 17, 2015, 02:17 PM IST

आता मोशन पॉवर फॅब्रिकने चार्ज करा फोनची बॅटरी!

वैज्ञानिकांनी फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी आता नवा शोध लावलाय. त्यांनी एक डबल लेअर मोशन पॉवर फॅब्रिक तयार केलंय. सिल्व्हर कोटेड विणलेल्या कापडानं आता मोबाईल फोन चार्ज होणार आहे.

Mar 17, 2015, 01:43 PM IST

१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके रद्द करणार, गडकरींची घोषणा

देशात १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहेत. यामुळं देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत, यात राज्यातील १२ टोलनाक्यांचा समावेश असेल. 

Mar 16, 2015, 03:17 PM IST

रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.

Mar 16, 2015, 12:50 PM IST

कॉम्रेड पानसरेंवरील हल्ल्याला १ महिना पूर्ण, मारेकरी मोकाटच

 महाराष्ट्र दोन विचारवंतांच्या हत्येनं हादरलाय... एक म्हणजे अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दुसरे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे... संतापजनक बाब म्हणजे दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरलेत.

Mar 16, 2015, 09:08 AM IST

दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश

नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Mar 15, 2015, 09:14 AM IST

वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार?

मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय. 

Mar 12, 2015, 07:56 PM IST

अप्रशिक्षित अधिकाऱ्यांमुळे बिबट्याचा मृत्यू, ही हत्याच!

नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी भटकणाऱ्या तहानेलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील कोंबडवाडी गावात हा प्रकार घडला आहे.

Mar 12, 2015, 03:11 PM IST

... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया

टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते. 

Mar 12, 2015, 02:57 PM IST

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू 

Mar 12, 2015, 02:43 PM IST