टर्किश एअरलाइनचं विमान रनवेवर घसरलं, २३८ जण सुरक्षित

काठमांडू इथं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळं अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे हे विमान दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

IANS | Updated: Mar 4, 2015, 06:41 PM IST
टर्किश एअरलाइनचं विमान रनवेवर घसरलं, २३८ जण सुरक्षित title=

काठमांडू: काठमांडू इथं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळं अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे हे विमान दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी त्रिभुवनदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्किश एअरलाइनचं A330 हे विमान उतरत होतं. धुक्यामुळं पहिल्या प्रयत्नात उतरणं धोकादायक असल्यानं वैमानिकानं दुसऱ्यांदा हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला असता हा अपघात झाला असल्याचं नेपाळ नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने सांगितलं आहे. 

दरम्यान, या A330 या विमानातील २३८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात संरक्षण यंत्रणेला यश आलं आहे. तसंच कोणत्याही प्रवाशाला गंभीर जखम झाली नसल्याचंही सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.