नाशिक

भुजबळ-बेंडसेंच्या संबंधांचा पर्दाफाश

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय.

May 18, 2013, 08:51 PM IST

नाशिक लाचखोरीचा तपास थंडावला

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांनी तपासात अप्रत्यक्ष असहकार पुकारल्यानं एसीबीचा तपास थंडावलाय.

May 13, 2013, 11:12 AM IST

स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोनं

नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक लॉकर्समध्ये अंदाजे सव्वातीन कोटींची मालमत्ता सापडलीये.

May 9, 2013, 07:08 PM IST

`चिखला`तून निघालं कोट्यवधींचं घबाड...

सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या मालमत्तेच्या मोजणीतून दोघांच्याही नावावर कोट्यवधींचं घबाड असल्याचं उघड झालंय... या दोघांनी जमवलेल्या काळ्याकमाईचा तपास अद्याप सुरूच असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

May 7, 2013, 10:24 AM IST

अभियंत्यांकडे घबाड, ४ किलो सोनं आणि एक कोटी

नाशिकच्या लाचखोर अभियंत्यांकडे ४ किलो सोनं आणि एक कोटी रूपये संपतीचे घबाड मिळालंय. सार्वजनिक बांधकाम विभागातला मुख्य अभियंता चिखलीकर आणि कनिष्ठ अभियंता वाघ या दोघांकडे घबाड सापडलंय. त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिका-यांचे डोळे अक्षरशः पांढरे व्हायची वेळ आलीय.

May 2, 2013, 10:55 PM IST

शेतकऱ्यांना चक्क पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबल

नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या खासगी रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला विरोध करणा-या शेतकऱ्यांवर सरकारी यंत्रणांचा आसूड पडतोय.

Apr 25, 2013, 06:57 PM IST

नाशकातील कुंभ मेळ्याची जागेवर अनधिकृत बांधकामे

नाशिक मनपा विकास आराखड्यतील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. यातील अनेक मालमत्ता विकल्या जात आहेत. मनपाच्या आशीर्वादाने साधुसंतांनी ठरवून दिलेली जागा हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Apr 22, 2013, 10:04 AM IST

नाशिकमध्ये तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं

नाशिक शहरात तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं आहेत. नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागाची ही आकडेवारी असून नगररचना विभागाचं सर्वेक्षण हे अद्यापही सुरु आहे.

Apr 15, 2013, 11:09 PM IST

दहावीच्या मुलीवर नराधम बापानंच केला बलात्कार!

नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडत होती.

Apr 13, 2013, 10:18 AM IST

राज ठाकरे पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधणार?

गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील सभेने त्यांच्या या दौऱ्याची सांगता होणार आहे.

Apr 3, 2013, 12:22 PM IST

डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या

नाशिकच्या दसक पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या जगन्नाथ खंडू सोनवणे या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

Mar 13, 2013, 05:28 PM IST

मनसेनेने विद्यापीठाच्या केंद्राला ठोकलं टाळं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राला टाळं ठोकलं. परीक्षा विभागाच्या कारभाला कंटाळून हे ठाळं ठोकण्यात आलंय.

Mar 8, 2013, 05:44 PM IST

नाशिकच्या अर्चनाची हॉलिवूडमध्ये भरारी!

हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर? विचारच आनंददाय वाटतो ना! पण, जर खरोखरच अशी संधी प्राप्त झाली तर... होय, अशीच संधी मिळालीय नाशिकच्या अर्चना पाटील हिला... नव्हे, तिनं ही संधी प्रचंड मेहनत करून मिळवलीय.

Mar 8, 2013, 01:26 PM IST

दरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.

Feb 21, 2013, 08:20 AM IST

राज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार

नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

Feb 20, 2013, 06:03 PM IST