महाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर : विदीत गुजराथी
बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर या सर्वोच्च किताबाला गवसणी घालण्याचा पराक्रम नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदीत गुजराथी यानं केलाय. अवघ्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर बनणारा विदित हा महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर बनलाय.
Oct 24, 2012, 06:27 PM ISTआस्थेचा बाजार बरखास्त; लड्डूगोपाल बाबा सुटणार?
नाशिकमध्ये आस्थेचा दरबार भरविणाऱ्या बाबानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. बाबाच्या भक्तांनीच बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आता सुटका करुन घेण्यासाठी बाबाची धावपळ सुरू आहे.
Oct 23, 2012, 02:27 PM ISTनाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण
मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छोट्या मोठ्या उद्योगांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलंय. मात्र यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाहीय.
Oct 16, 2012, 06:46 PM ISTमहागाईत चक्क सिलिंडरचीही चोरी!
महागाईनं इतका कळस गाठलाय की आता चक्क गॅस सिलिंडर्सची चोरी होऊ लागलीय.
Oct 3, 2012, 09:53 AM ISTबाप्पाच्या निरोपाची लगबग
मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मानाचा पहिला गणपती `गणेश गल्लीचा राजा` तर पुण्यात कसबा गणपतीनेही प्रस्थान करण्यास सुरूवात केली आहे
Sep 29, 2012, 11:41 AM ISTनाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`
नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.
Sep 29, 2012, 08:17 AM ISTनाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात...
नाशिक महापालिकेनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृती आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. हा आराखडा वादात अडकलाय. यंदाच्या आराखड्यात मागच्या आराखड्यातूनच उचलेगिरी केल्याचा आरोप होतोय.
Sep 7, 2012, 08:47 AM ISTयशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता.
सचिन तेंडुलकरनं यावेळी दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं.
चांदण्या पाठीच्या कासवामुळं तस्करीचा पर्दाफाश
नाशिक जिल्ह्यात सध्या कासवं, घुबडं यांची अंधश्रद्धेपोटी तस्करी होतेय. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवहारातून होते. नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये या कासवाची विक्री होत होती. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला आणि पुढचा अनर्थ टळला.
Sep 1, 2012, 12:10 AM IST‘बोगस महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक’
राज्यातल्या सहा आयुर्वेदिक महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातल्या बीएमएसच्या अकराशे विद्यार्थ्यांचं दीड वर्ष आणि लाखो रुपये वाया गेले आहेत.
Aug 28, 2012, 10:57 PM ISTआदिवासींच्या जमिनी गडप, पिचड वादात
नाशिक जिल्ह्यात आदिवासींची फसवणूक करण्यात आलीय. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या कुटुंबीयांनीच ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आदिवासींच्या जमिनी अतिशय कवडीमोल भावानं हडपल्याचा आरोप होतोय.
Aug 23, 2012, 08:56 AM ISTरखडल्यात अनेक `सावरपाडा एक्सप्रेस`!
कवितानं घेतलेल्या मेहनतीला सोयी सुविधांची जोड मिळाली असती तर ती ऑलिम्पिकसाठीही पात्र होऊ शकली असती. अशा अनेक कविता नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागात आहेत. पण सुविधा नसल्यानं अशा अनेक सावरपाडा एक्सप्रेस रखडल्यात.
Aug 21, 2012, 08:16 AM ISTकडू कांदा; शेतकऱ्यांचा वांदा!
वरूणराजाचं आगमन लांबल्यानं नाशिकचा कांदा महागण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने पोळ कांद्याचं पीक सप्टेंबरपर्यंत येणार आहे. त्यामुळे सध्या शेतात साठवलेला कांदा बाजारात कमी पडणार आहे.
Aug 8, 2012, 07:58 AM ISTनाशिक पोलिसांचं मिशन... 'ऑल आऊट'
शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस शुक्रवारी पुन्हा एकदा अचानक रस्त्यावर उतरले. या मिशनअंतर्गत ४२४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. तर १९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन वर्गणी उकळणाऱ्यांवर तक्रारी करण्याचं आवाहन केलं.
Jul 29, 2012, 02:56 PM ISTबस चालकांची गुर्मी; विद्यार्थी करतायत भरपाई
विद्यार्थ्यांची ही तोबा गर्दी.... बस थांब्यावर न थांबता सुसाट धावणाऱ्या बस... बसमागे दप्तराचं ओझं सांभाळत धावणारे विद्यार्थी... नाशिकमध्ये कुठल्याही बसस्टॉपवर दिसणारं हे दृश्यं... चालक बसस्टॉपच्या आधी तरी बस थांबवतो किंवा नंतर तरी... पण बस स्टॉपच्या ठिकाणी बस कधीच थांबत नाही...
Jul 25, 2012, 09:31 AM IST