एका गावाचे सतराशे साठ नवरे!
त्रिंबकेश्वर नगरपालिकेत लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पंधरा नगराध्यक्ष शहराच्या नशिबी आलेत. महाप्रसादाप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिलं जात आहे.
Jul 19, 2012, 09:17 AM ISTकोर्टाच्या आदेशांना दाखवला 'भंगार बाजार'
अंबड सातपूर लिंक रोडवरचा भंगार बाजार हटविण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. हायकोर्टानं बाजार हटविण्याचे आदेश दिलेत तरिही महापालिका प्रशासन पावलं उचलत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर हे काम करणार कधी? या मुद्यावरून महापालिका आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलसवी सुरू आहे.
Jul 18, 2012, 09:37 AM ISTयुवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Jul 15, 2012, 12:58 PM ISTचला मुंबईकरांनो तयार व्हा, 'पाण्यावर तरंगण्यासाठी'
‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मेरीटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस’ यांच्या सहकार्यातून मुंबई येथून राहुरीचे मुळा धरण, तसेच नाशिक, पुणे येथे समुद्री विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
Jul 12, 2012, 12:53 PM ISTबँकेनं शाळेलाच ठोकलं सील
वेळेत कर्जपरफेड न केल्यानं एका को-ऑपरेटीव्ह बँकेनं एका शाळेलाच सील ठोकण्याचा पराक्रम केलाय. पण, त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतोय.
Jul 11, 2012, 02:49 PM ISTपोटच्या मुलीनेच केली आईची हत्या
www.24taas.com, नाशिक
प्रेमाला विरोध केला म्हणून मुलीनंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडलीय.... अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आईचा खून केला आणि मृतदेह कसारा घाटात फेकला.
Jul 5, 2012, 07:51 PM IST
बळीराजा ठरलाय नाशिक अर्थव्यवस्थेचा कणा
पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बळीराजा घेणार आहे.
Jul 4, 2012, 08:57 PM ISTमुंबई, पुणे, नाशकात पाण्याचे गहिरे संकट
पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. पाणीकपाती संदर्भात आज होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.. मुंबईत १ जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान हिच स्थिती पुणे आणि नाशिकमध्ये आहे. त्यामुळे पाण्याचे गहिरे संकट दिसून येत आहे.
Jun 27, 2012, 01:13 PM IST'ब्रह्मगिरी'चं अस्तित्व धोक्यात!
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झाली आहेत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय, हे तर उघडउघड सत्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजकारणीही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत.
Jun 22, 2012, 09:03 AM ISTक्लास लावायचायं तर फक्त होर्डींग पाहा...
नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा जाहिरातींचं पेव फुटलं आहे. मात्र शहरात सुरु असलेली फलकबाजी कुठल्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नाही. तर हे होर्डिंगवॉर खासगी क्लासेस आणि शिक्षणसंस्था चालकांमध्ये आहे.
Jun 16, 2012, 07:13 PM ISTराज्यभरात सोनोग्राफी सेंटर्सवर धाड
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर प्रशासनानं तातडीनं कामाला लागलंय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर्सवर धाड टाकली गेलीय. आज टाकलेल्या धाडींत धुळ्यात एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आलीय, तर जळगाव आणि नाशिकमध्ये अनेक सोनोग्रापी सेंटर्सना सील ठोकण्यात आलंय.
Jun 8, 2012, 05:23 PM ISTझी २४ तासचा दणका; जेलर जेलबाहेर
‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर एलिस्टर परेराची बडदास्त ठेवणाऱ्या नाशिक प्रभारी तुरुंग अधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर नाशिकच्या जेलला पूर्णवेळ जेलर मिळू शकणार आहेत.
Jun 6, 2012, 09:48 PM ISTनाशिककरांवर पाणीटंचाईचं संकट...
मान्सून समोर दिसत असला तरी, नाशिककरांसमोर मात्र पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं दिसतंय. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. शहरासाठी फक्त ७५० एमसीएफटी पाणी शिल्लक असल्यानं कमी दाबानं पाणीपुरवठा केला जातोय. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शहरात पाणीकपात होतेय. त्यामुळे नाशिककरांचे डोळे लागलेत ते पावसाकडे...
Jun 5, 2012, 04:07 PM ISTनाशिक कारागृहात आरोपीची शाही बडदास्त
मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Jun 2, 2012, 09:55 AM ISTनाशकात चिठ्ठीची कमाल, राष्ट्रवादीला लॉटरी
विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाचा निकाल अखेर नाट्यमय पद्धतीनं लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत जाधव यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणेंचा चिठ्ठी पद्धतीनं पराभव केला. जयंत जाधवांना नशीबानं साथ दिल्यानं जास्त मतांची जमवाजमव करूनही शिवसेनेच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
May 29, 2012, 08:26 AM IST