अभियंत्यांकडे घबाड, ४ किलो सोनं आणि एक कोटी

नाशिकच्या लाचखोर अभियंत्यांकडे ४ किलो सोनं आणि एक कोटी रूपये संपतीचे घबाड मिळालंय. सार्वजनिक बांधकाम विभागातला मुख्य अभियंता चिखलीकर आणि कनिष्ठ अभियंता वाघ या दोघांकडे घबाड सापडलंय. त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिका-यांचे डोळे अक्षरशः पांढरे व्हायची वेळ आलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2013, 11:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या लाचखोर अभियंत्यांकडे ४ किलो सोनं आणि एक कोटी रूपये संपतीचे घबाड मिळालंय. सार्वजनिक बांधकाम विभागातला मुख्य अभियंता चिखलीकर आणि कनिष्ठ अभियंता वाघ या दोघांकडे घबाड सापडलंय. त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिका-यांचे डोळे अक्षरशः पांढरे व्हायची वेळ आलीय.

चिखलीकरच्या लॉकरमध्ये ४ किलो सोनं आणि १ कोटी रुपये सापडलेत. याआधीच त्याच्या घरातून तीन कोटी जप्त करण्यात आलेत. चिखलीकरकडे बिअरबार आणि पेट्रोलपंपाची लायसन्सही सापडलीयत. त्याची विविध ठिकाणी बेनामी गुंतवणूक असल्याचंही उघड झालंय.

नांदेडमध्ये चिखलीकरचे जमीनजुमले आहेत. तर कनिष्ठ अभियंता वाघनंही आपल्या साहेबांपेक्षा आपण कमी नाही, हे दाखवून दिलंय. त्याच्या आयडीबीआय लॉकर्समध्ये चाळीस लाखांची रोकड आणि तीस तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत.
विशेष म्हणजे शासकीय निवासस्थानात राहणा-या या दोघांचेही नाशिक शहरात प्राईम लोकेशनला फ्लॅटसही आढळून आलेत. दोघांचीही संपत्ती इतकी आहे की त्याच्या मोजणीला आठवडाभर लागण्याची शक्यताय.