नाशिकच्या महापौर, आयुक्तांची खूर्ची जप्त!
नाशिकचे महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी महापालिकेत पोहोचलेत. खुर्ची जप्त करण्याची मुदत वाढवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झालीय.
Oct 14, 2013, 06:59 PM ISTराज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम
राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात अष्टमी आणि नवमीच्या स्वागतासाठी फुलांची उधळण सुरु आहे. शेतात ठिकठिकाणी पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या झेंडूनी शेती बहरली आहे. जणू काही नवरात्रीनिमित्त भूमातेनेही फुलांचा साज परिधान केला आहे.
Oct 12, 2013, 11:54 AM ISTनाशिकच्या महापौरांचं खळ्ळ-फट्टॅक!
नाशिकच्या महापौरांनी स्वच्छता निरीक्षकाच्या चक्क थोबाडीत मारलीय. ३ दिवस कचरा उचलला जात नव्हता, त्याचा राग येऊन महापौर यतीन वाघ यांनी स्वच्छता निरीक्षक शंतनु बोरसे यांच्या थोबाडीत मारलीय.
Oct 10, 2013, 04:02 PM ISTसप्तश्रुंगी गडावर भाविकांची गर्दी, २४ तास दर्शनाची सोय
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्रौत्सवास लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दोन दिवसात दोन लाख भाविकांनी हजेरी लावली.
Oct 6, 2013, 07:49 PM ISTराज ठाकरेंच्या `ड्रिम प्रोजेक्ट`साठी रिलायन्सचा हात!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुचर्चीत गोदापार्कच्या मार्गातले अडथळे दूर करून त्याचा प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी केलाय.
Oct 5, 2013, 07:24 PM ISTआता अँन्ड्रॉईडवरही खेळा ‘दहीहंडी’...
मैदानी धावपट्टीवर असो की बुद्धिबळाच्या चौकटीवर नाशिकच्या लहान वयातल्या खेळाडूंनी आपली छाप सातासमुद्रापार सोडलीय.
Oct 4, 2013, 09:36 PM ISTनाशिकमध्ये भरदिवसा सिनेमास्टाईल दरोडा
नाशिकरोडसारख्या गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला. आता या घटनेला २४ तास उलटून गेलेत. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती सुगावा लागलेला नाही. या दरोड्यानंतर ठेवीदारांची झोप उडालीय.
Oct 2, 2013, 11:27 PM ISTराजीव पाटील यांना अखेरचा निरोप!
दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.
Oct 1, 2013, 01:14 PM ISTराजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार
आपल्या सगळ्या सिनेमांमधून सामाजिक भान जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरूण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्यांच्या नाशिकमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणारेय. त्यांच्या निधनामुळम सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय.
Oct 1, 2013, 08:39 AM ISTनाशिकच्या विदीतनं रचला इतिहास!
नाशिकच्या विदीत गुरराथीनं ‘वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप’मध्ये ब्राँझ मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केलीय.
Sep 27, 2013, 05:53 PM ISTपाण्यासाठी संगमनेर, निफाडच्या ग्रामस्थांचं आंदोलन!
दारणासह गंगापूर धरण तुडूंब भरलं असून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी ओसंडून वाहत असताना गोदावरीचे डावा आणि उजवा कालवा बंद करण्यात आलेत.
Sep 26, 2013, 10:45 AM ISTदेवळाली: सैन्य भरती दरम्यान चेंगराचेंगरी
नाशिकमध्ये देवळाली लष्करी कॅम्पमध्ये प्रादेशिक सेनेच्या भरती प्रक्रियेवेळी नाशिक शहरात विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झालीय.
Sep 24, 2013, 03:20 PM ISTही मनसेवर नामुष्की आहे का?
नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.
Sep 24, 2013, 01:23 PM ISTउन्हाळी कांद्याला सोन्याचा भाव!
उन्हाळी कांद्याची घटत चाललेली आवक आणि पावसामुळं लाल कांद्याचं बाजारात लांबलेलं आगमन यात सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव चढेच आहेत.
Sep 17, 2013, 11:35 AM ISTब्लू प्रिंट, नाशिक रस्त्यांबाबत ‘राज’ गप्प!
राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आज नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपला दौरा आटोपता घेणार आहे.
Sep 5, 2013, 12:02 PM IST