www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांनी तपासात अप्रत्यक्ष असहकार पुकारल्यानं एसीबीचा तपास थंडावलाय.
सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळं एसीबीला त्यांची चौकशी करता येत नाही. बेनामी संपत्तीची माहितीही मिळवता येत नाहीये. त्यामुळं बेनामी संपत्तीचा शोध थांबलाय.
या लाचखोर अधिका-यांची चौकशी करता यावी यासाठी एसीबी न्यायालयाकडे जाणार आहे. दुसरीकडे लाचखोर चिखलीकरची बायको स्वातीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. स्वाती अटक टाळण्याच्या प्रयत्नात आहे. कोर्ट तिच्या अर्जावर काय निर्णय देते याकडं एसीबीचं लक्ष लागलयं.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रत्येक अधिका-याला आपल्या संपत्तीचं विवरण बंधनकारक करण्यात आलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामकुमार मुखर्जी यांनी ही माहिती दिलीय. लाचखोर अभियंता सतीश चिखलीकरच्या कामांची गुणवत्ता दक्षता विभागानं चौकशी सुरु केलीय. त्यावेळी मुखर्जी बोलत होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.