नाशिक

नाशिककरांनो, डोळ्यांत तेल घालून मुलांची काळजी घ्या!

नाशिकमधल्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये पाच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झालाय. यामधल्या दोन मुलांनी प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करुन घेतली...

Dec 2, 2013, 09:40 PM IST

विजय पांढरेंची राजकीय इनिंग सुरू

जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांनी निवृत्त झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. राजकारणाच्या आखाड्यात उतरणाऱ्या पांढरे यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास पांढरे उत्सुक आहेत.

Dec 1, 2013, 09:04 PM IST

वडिलांनीच फेकले गोदावरी नदीत ६ वर्षांच्या मुलीला

नाशिकमधून धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये वडिलांनीच आपल्या ६ वर्षांच्या मुलीला गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल २ महिन्यांनी ही घटना उघडकीस आलीय. त्या मुलीचा गुन्हा फक्त एवढाच की ती मुलगी जन्मतःच अंध होती.

Nov 20, 2013, 11:37 AM IST

भोंदूबाबानं पळवलं नाही नवऱ्यानंच विकलं?

नाशिकमध्ये आपल्याच शिष्याची बायको पळवून नेणाऱ्या हरिओम बाबा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. बाबानं आपल्याला पळवलं नाही तर पती मंगेश तनपुरेच्या भीतीपोटी कालिया बाबाच्या घरी सुखरूप असल्याची कबुली संबंधीत महिलेनं दिलीय. पतीनं १५ लाख रुपयांना आपल्याला नाशिकमधील एका महिलेला विकलं असल्याची धक्कादयक माहिती तिनं दिलीय. तर भोंदूबाबाचीच फूस असल्यानं आपल्यावर आरोप होत असल्याचा दावा मंगेशनं केलाय.

Nov 18, 2013, 08:57 PM IST

गुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलं

देवळा तालुक्यातल्या हरी ओम बाबाचे काळे कारनामे चर्चेत असताना नाशिकमध्ये आणखी २ भोंदुबाबांचे प्रताप समोर आलेत. गुप्त धनाचं आमिष दाखवून जवळपास साडेचार लाखांना फसवलं गेल्याचं समोर आलंय.

Nov 12, 2013, 04:57 PM IST

शपथ सप्ताहापुरतीच... लाचखोरीत सरकारी अधिकारी अव्वल!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भ्रष्टाचाराच्या या दलदलीत सरकारी अधिकारी ही अडकल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. चालू वर्षात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सतीश चिखलीकर सारख्या तब्बल ७९ लोकसेवकांना लाचखोरी करताना रंगेहात पकडण्यात आलंय.

Nov 11, 2013, 12:01 AM IST

नाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!

ऐन दिवाळीत एटीएममधले पैसे संपल्याच्या अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात. पण नाशिकमध्ये वेगळीच घटना घडलीय. एटीएममधून चलनातून बाद झलेल्या ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Nov 6, 2013, 05:55 PM IST

महापौरांची वाढवलेल्या बोनसला पुन्हा कात्री!

नाशिक महापालिकेत नक्की मनसेचं राज्य आहे की आयुक्तांचं असा प्रश्न उपस्थित झालाय. महापौरांनी वाढविलेल्या बोनसला पुन्हा एकदा आयुक्तांनी कात्री लावलीय.

Oct 30, 2013, 10:36 PM IST

`कांदा` पण नांदा!

दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.

Oct 25, 2013, 09:04 PM IST

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात `ताईं`ची झाडाझडती!

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ रांचीमध्ये शक्तीप्रदर्शन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नाशकात ठाण मांडून होत्या. मात्र नेहमी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात दिलखुलास वावरणाऱ्या सुप्रियाताईंचा रुद्रावतार नाशिकच्या पदाधीकाऱ्यांनी बघितला.

Oct 25, 2013, 05:35 PM IST

नाशिकमध्ये मनसेचं ‘डॉक्टर’स्टाईल आंदोलन

डॉक्टरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात पुणे महापालिकेच्या सभागृहात काल मनसेच्या नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलं.

Oct 22, 2013, 11:21 AM IST

नाशिकमधील २० गावांची झोप उडते तेव्हा...

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या २० गावांची सध्या झोप उडालीय. या गावांना भूकंपाचे धक्के बसतायत.पण हे नक्की कशामुळे होतंय, त्याचा शोध लागलेला नाही. एक रिपोर्ट.

Oct 18, 2013, 07:54 AM IST

वीज दुरूस्तीचा भार आता महिलांवर

गावातली वीज गेली आणि दुरूस्तीसाठी वीज कंपनीने एखाद्या महिलेला पाठवले तर `शॉक` लागण्याचं काही कारण नाही. यापुढे वीज दुरूस्तीचा भार केवळ वायरमनच नव्हे, तर वायरवुमनही वाहणार आहेत. महावितरणनं राज्यात 2 हजार वायरवुमनची भरती केली असून त्यांना सध्या नाशिकच्या एकलहरे केंद्रात प्रशिक्षण दिलं जातंय.

Oct 17, 2013, 03:58 PM IST

नाशिकमध्ये 5 वर्षीय मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार

पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडलीय. नाशिकच्या श्रीरंग नगरमध्ये दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडलाय.

Oct 16, 2013, 09:23 AM IST

‘कायदेतज्ज्ञ’ महापौरांची खुर्ची जप्त होणार?

येत्या २४ ऑक्टोबरला नाशिकच्या महापौरांची खुर्ची जप्त झाली तर बसायचं कुठे? हा प्रश्न नाशिकच्या महापालिकेला पहिल्यांदा सोडवावा लागेल.

Oct 15, 2013, 11:10 PM IST