Mirza Abbas Ali : जर एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला तर चांगले नाहीतर तो चित्रपट फ्लॉप झाला तर चाहत्यांसह निर्माते देखील आपले मत बदलतात. असाच काहीसा प्रकार साऊथचा कलाकार मिर्झा अब्बास अलीसोबत घडला. तो इतका अस्वस्थ झाला होता की, एकेकाळी त्याने चित्रपट जगताचा निरोप घेतला.
अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांची कारकीर्द आश्चर्यकारक आहे. अभिनेता मिर्जा अब्बास अलीचीही अशीच कारकीर्द होती. परंतु एका चुकीच्या निर्णयामुळे त्याचे नशीब कायमचे बदलते. यानंतर त्यांच्या आयुष्यातील खरा संघर्ष सुरू झाला. एक काळ असा होता त्याला पेट्रोल पंपावर काम करावे लागले. त्यासोबतच बाथरूम साफ करायचे आणि मेकॅनिकचे काम करावे लागले.
या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण
मिर्जा अब्बास अलीने 1994 मध्ये मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 1996 मध्ये तमिळ चित्रपट 'कधल देसम' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट हिट झाला. यानंतर अभिनेत्याने प्रिया ओ प्रिया, राजहंसा, राजा, कन्नेज़ुथी पोट्टुम थोट्टू, सुयमवरम आणि पदयप्पा सारखे अनेक तेलुगु आणि तमिळ हिट चित्रपटांमधील कामाने सर्वांची मने जिंकली. जवळपास अभिनेत्याचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले.
कमल हसनसोबतही केलंय काम
मिर्झा अब्बास अली यांनी कमल हासनसोबत देखील काम केले आहे. कमल हसल यांच्या 'हे राम' या चित्रपटातही त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. कमल हासन आणि शाहरुख खान या दोघांच्या या चित्रपटात काम केल्यानंतर मिर्झा अब्बास अलीने हिंदी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. 'कंदुकोंडैन कंदुकोंडैन' हा मिर्झा अलीच्या कारकिर्दीतील मोठा हिट चित्रपट होता, ज्यामध्ये त्याने ऐश्वर्या राय बच्चनसोबत काम केले होते. यात मामूटी, अजित कुमार आणि तब्बू देखील होते. यानंतर तो 'मिन्नाले' या चित्रपटातही दिसला होता. त्याचप्रमाणे तो तब्बूसोबत एका सुपरहिट चित्रपटातही दिसला होता.
2002 मध्ये अलीने अंश या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यासोबतच तो आणखी एका चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचे हे दोन्ही चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरले. हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांनी अनेक साउथ चित्रपटांना नकार दिला होता. त्यानंतर त्यांचे चित्रपट चालले नाहीत त्यामुळे असे म्हटले जाते की, त्यांना यामुळे पेट्रोल पंपावर देखील काम करावे लागले होते.