10
10
ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत स्पष्टीकरण दिल्यानंतरही काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. उलट काँग्रेस या मुद्यावरुन आणखी आक्रमक झालीय. सलग चौथ्या दिवशी काँग्रेसनं संसदेबाहेर आंदोलन केलं.
भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ल्यानंतर येथे पकडण्यात आलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नवेद याने म्हटले आहे की, असे हल्ले करण्यात मजा येते.
जम्मू-श्रीनगर हायवेवर उधमपूर जिल्ह्यात सामरोली इथं BSFच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत, तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलंय. सीमा सुरक्षा दलाचे 8
गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली.
दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय.
चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या कथेत मुन्नीला पवन पाकिस्तानात घेऊन जातो. पण प्रत्यक्षात पाकिस्तानात एक अशी मुलगी आहे जी, अनेक वर्षांपासून भारतात परतण्याची वाट पाहतेय. विशेष म्हणजे चित्रपटातील मुन्नी सारखीच ही मुलगी पण बोलू शकत नाही.
याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारला असून यापुढे फाशीची शिक्षा रद्द व्हावी, असं सुरेंद्रनाथ यांनी सांगितलं आहे.
विम्बल्डन टेनिसच्या महिला दुहेरी गटाचं जेतेपद पटकावून इतिहास रचणार्या भारताच्या सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं ही शिफारस करण्यात आली असून आता या विषयीचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीनं घ्यायचा आहे.
गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे.
अमेरिकतून आलेल्या रिपोर्टनंतर भारतासमोर इसिसचं संकट किती गंभीर आहे, याची दखल आता सरकारनं घेतलेली आहे.