10
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर उद्या आणि परवा होणारी चर्चा रद्द करण्याचे संकेत भारतानं दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर हुर्रियत नेता शब्बीर शाह यांना दिल्ली विमानतळावर नजरकैदेत ठेवण्यात आलंय.
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लंडनमधील जागेचा व्यवहार हा लालफितीत अडकलाय.
फुलराणी सायना नेहवाल ब्रँडच्या दुनियेची सम्राज्ञी झाली आहे. तिनं आयओएस स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मट कंपनीबरोबर दोन वर्षांसाठी २५ कोटींचा करार केलाय. वर्ल्ड नंबर वन झाल्यानंतर सायनाची ब्रँड व्हॅल्यूही वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा यांच्या दरम्यान हॉटलाईन सुरू झाली आहे. ओबामांचे दक्षिण आशियाविषय विशेष सहाय्यक पीटर लेव्हॉय यांनी ही माहिती दिली.
आता बातमी तुमच्या कामाची. आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी मतदार संघात जोरदार धक्का बसला. राहुल गांधी लोकांनी गाडी अडवून विचारले, आमच्या वहिनींना सोबत घेऊन येणार? या प्रश्नानंतर राहुल यांचा गोंधळ उडाला.
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आली आहे. सायनाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ही सुटी लागू होणार आहे.
नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.
परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्यांना २५ हजारापेक्षा कमी किंमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाही. कस्टम बॅग्स डिल्करेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनं लागू केलेत.