10

देशात कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत विशेष खबरदारी

देशात कोणताी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई मार्गाने देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की

सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता

स्वातंत्र्य दिनावर दहशतवादाचं काळं सावट पसरलंय. दहशतवादी देशात हवाई हल्ला करण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतचा अलर्ट जारी केलाय.

रुपयाची सलग ८ दिवस घसरण

रुपयाच्या मुल्यामध्ये आज सलग आठव्या दिवशी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात रुपयाचं मुल्य २४ पैशांनी घसरलं आणि एका डॉलरचा दर ६५ रुपये ३४ पैशांवर गेलाय. 

मोदी सरकारची भूमीअधिग्रहण, जीएसटी विधेयक लटकलीत

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सकरकाची महत्वाची दोन भूमीअधिग्रहन आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत.

चीनमध्ये भीषण स्फोटात ३० ठार

चीनचं औद्यगिक त्याझिनमध्ये रात्री उशिरा झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झालाय, तर ४०० हून अधिक लोक जखमी आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये मशीदबाहेर स्फोट, १०जण जखमी

जम्मू-काश्मीरच्या शोपियां गावात आज सकाळी एका मशीदबाहेर झालेल्या स्फोटात १० जण जखमी झालेत. सकाळी नमाजच्या वेळी झालेल्या स्फोटानं साऱ्या गावाला हादरा बसलाय.

नरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस

आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्यावर संसदेत घमासान सुरु असताना  आज 'मोदीगेट' प्रकणावरुन संसदेत गरमागम चर्चा सुरु झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त करुन रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खर्गे यांनी केली.

आलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.

आता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास

विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती.