नवी दिल्ली : ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत स्पष्टीकरण दिल्यानंतरही काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. उलट काँग्रेस या मुद्यावरुन आणखी आक्रमक झालीय. सलग चौथ्या दिवशी काँग्रेसनं संसदेबाहेर आंदोलन केलं.
काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवन परिसरात निदर्शनं केली. सोनिया गांधी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर हल्लाबोल केलाय. सुषमा स्वराज नौटंकी करण्यात पटाईत असल्याची बोचरी टीका सोनिया गांधी यांनी केलीय. तसंच सुषमा यांना फक्त राजकारण करायचंय, अशी टीकाही त्यांनी केलीय.
दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर हल्लाबोल केलाय. स्वराज यांनी ललित मोदींना लपूनछपून मदत केल्याचा आरोप राहुल यांनी केलाय. तर भाजपच्या रविशंकरप्रसाद यांनी राहुल गांधींचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हंटलंय.
काँग्रेसची संसदभवनात निदर्शनं सुरूच आहेत. २५ खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यात येत असून सलग चौथ्या दिवशी काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.