10
10
भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे.
सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.
फाशीला स्थिगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनवाणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झालेत. त्यामुळे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, कलाम यांच्या निधनानंतर आज कोणतीही सुटी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.
सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण तुम्ही सोनं खरेदीची घाई करत असाल, तर जरा थांबा बाजारातील तज्ज्ञांनुसार पुढील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होणार असून सोनं 23 हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.
एस. एस. राजमौली यांचा सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'नं आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. चित्रपटाचं पोस्टर ५० हजार स्क्वेअर फूट मोठं बनवलं होतं. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय.
दमदार डॉयलॉग, मोहात पाडणारी व्यक्तिरेखा, कारचा थरार अशा अॅक्शन पॅक्स सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेम्स बॉण्डचा नवा चित्रपट येतोय. 'स्पेक्टर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.
जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.
अंडरग्राउंड रस्त्यावर तरुण जोडप्याचा 'किस'चा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून पोलिसांनी आता प्रवाशांना चेतावनी दिलीय. जर आता कुणी अंडरग्राऊंड रस्त्यावर किस करतांना आढळलं तर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.
सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि एस. एस. राजमौली यांचा 'बाहुबली' या चित्रपटांमध्ये एक खास कनेक्शन आहे. ते म्हणजे के. वी. विजयेंद्र प्रसाद यांनी या दोन्ही चित्रपटांची कथा लिहिलंय.