10
10
रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
गुजरातचे वादग्रस्त निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अखेर गुजरात सरकारने निलंबित केले आहे. संजीव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि श्रीलंकेविरोधात दुसरी कसोटी आजपासून सुरु होणार आहे. मुरली विजय टेस्टसाठी सज्ज झालाय.
उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात खाप पंचायतीने दलित मुलीसोबत रेप करण्याचं फर्मान सोडलंय. पीडित मुलीच्या भावाने दुस-या जातीच्या मुलीला घेऊन फरार झाला होता. त्यामुळे खाप पंचायतीने हा तालिबानी फतवा सोडला. या प्रकरणी मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका करून संरक्षणाची मागणी केलीय.
पती बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.
नवी मुंबई प्रमाणे बीड जिल्ह्यातील परळी इथं धक्कादायक घटना घडलीय. मागील १६ वर्षांपासून आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला परळी पोलिसांनी अटक केलीय. दोन वेळा ही मुलगी गरोदरही होती.
पाकिस्तानातील अटक इथं आत्मघाती हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री कर्नल शूजा खानजादा यांचा मृत्यू झालाय. ते ७१ वर्षांचे होते. खानजादा यांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना हा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
१९९० साली आलेल्या 'आशिकी' चित्रपटात अनुची भूमिका साकारणारी दिल्लीतील अनु अग्रवाल मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. तिनं आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केलीय. तिची आत्मकथा 'अनयूजवल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' प्रकाशित झालीय.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. ६३ रन्सने भारतावर श्रीलंकेने मात केली.
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.