10
10
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निर्बंध घातले आहेत. यामध्ये दौऱ्यावर जाताना पत्नी, गर्लफ्रेंडला नेण्यास बंदीचा समावेश आहे.
१९९३च्या मुंबई हल्ल्याचा दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाचा अंतिम प्रवास संपला. तिरंग्यात लपेटल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीनं मानवंदना दिली. त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला.
पंजाबमधील गुरदासपूर इथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिक्षक बलजित सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंजाबचे महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी बलजित सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
अमेरिकन प्रसारमाध्यमांनी आज इसिसबद्दल एक धक्कादायक माहिती दिलीय. आपल्या क्रूरकृत्यांसाठी चर्चेत असलेली दहशतवादी संघटना इसिसचं आता टार्गेट भारत असल्याचं कळतंय. भारतावर हल्ला करण्यासाठी ते कट रचत असल्याचं अमेरिकन प्रसारमाध्यमांनी सांगितलंय.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात चार जवानांसह आठ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.
अंशु गुप्ता आणि संजीव चतुर्वेदी या दोन भारतीयांचा रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. अंशु गुप्ता हे दिल्लीतील गुंज या एनजीओचे संस्थापक आहेत तर संजीव चतुर्वेदी हे एम्सचे सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. संजीव चतुर्वेदी यांनी एम्सच्या माजी मुख्य दक्षता अधिकारीपदी ही काम केलय.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.
सध्या देशभर गाजत असलेल्या लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर यांना अटक केलीय.
पंजाबमध्ये गुरूदासपूरमध्ये कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अजून भीती संपलेली नाही. गुरूदासपूरमध्ये काल ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून आज 8 जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत. त्यातला एक बॉम्ब पंजाब पोलिसांच्या बॉम्बनाशक दलानं निकामी केलाय.