10
10
वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे.
भाजपच्या नुकत्याच संपलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस जाणूनबूजन देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं.
आधार कार्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्ट बजावले आहे. तुमचे आधार कार्ड सक्तीचे नाही, याबाबत तशी जाहिरात करा, असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलाय.
चीनची आघाडीची मोबाईल कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरु केले आहे. आंध्रप्रदेशमध्ये पहिला मेड इन इंडिया स्मार्टफोन लॉन्च केला. या स्मार्टफोनची किंमत६,९९९ रुपये आहे.
येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानेच नेते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी यादव यांना नोटीस पाठवून मैदान खाली करण्याचे बजावले होते. मात्र, आंदोलन सुरु असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
'केएफसी' कंपनी फ्राईड चिकन बनवण्यासाठी अत्यंत निकृष्ट खाद्यतेलाचा वापर करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारच्या फूड सेफ्टी ऍण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन विभागानं त्या कंपनीला दोनदा नोटीस पाठवली आहे.
टीम इंडियातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ही विश्रांती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यामुळे मिळल्याचे पुढे आले आहे. मोदींच्या ई-मेलमुळे त्याला टीममधून वगळण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया या दोघांना आज सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी एक याचिका दाखल केली होती.
जम्मूतील उधमपूर येथील हल्ल्यात शहीद झालेला BSFचा जवान रॉकी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काबुलमध्ये ट्रकमध्ये झालेल्या स्फोट तर कंधारमध्ये आत्मघातकी अतिरेक्यांचा खात्मा, अमेरिकेचा लष्कर-ए-तोयबाला इशारा आदी बातम्या आता एका क्लिकवर वाचता येणार आहे.