... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती

दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय. 

PTI | Updated: Aug 4, 2015, 10:37 AM IST
... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती title=

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय. 

भारती दिल्ली विधानसभेत 'चौकशी आयोग'च्या निर्मितीबाबत चर्चेदरम्यान म्हणाले, 'मला पूर्ण विश्वास आहे की, जर दिल्ली सरकारला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं, म्हणजे सुंदर स्त्रिया न घाबरता मध्यरात्रीही बाहेर जावू शकेल.' त्यांनी सांगितलं, 'आम्ही पूर्णपणे सुरक्षित दिल्ली देऊ'. भारतीच्या या वक्तव्यावर भाजप आणि काँग्रेसनं सडकून टीका केलीय.

दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, 'महिलांसाठी हे खूप अपमानकारक वक्तव्य आहे. मात्र कायदा मंत्री असतांना कायदा तोडणाऱ्या वक्तीनं असं वक्तव्य करणं काही आश्चर्यकारक नाहीय. त्यातून त्यांची वृत्ती दिसते.' तर भाजप नेते विजेंद्र गुप्ता म्हणाले, आम आदमी पक्षाच्या नेत्याचं हे खूप आक्षेपार्ह विधान आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.