10

सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

पीएफचे पैसे मुदतीपूर्वी काढता येणार नाहीत?

भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला हवे तेव्हा काढता येणार नाहीत. त्याला लगाम घालण्यात आलाय. निवृत्तीआधीच पैसे काढून घेण्यास मनाई करण्यात आलेय. तसेच ५८ वर्षांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत.

व्यापमं घोटाळा : माझ्याही जीवाला धोका - उमा भारती

व्यापमं घोटाळ्यामध्ये एकामागून एक गूढ मृत्यू होत असल्यामुळे मला स्वतःलाही आता भीती वाटू लागली. माझ्यीह जीवाला धोका आहे, असे विधान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे. 

पेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, ६ देशांना भेटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ देशांच्या दौऱ्यांसाठी रवाना झालेत. रशिया आणि मध्य आशियामधील पाच देशांचा यांत समावेश आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना

दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

स्पाइसजेटनं विमानप्रवास अवघ्या १,८९९ रुपयांत

स्पाइसजेटनं पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास ऑफर आणलीय. आपल्या विमानप्रवासाचे दर पश्चिम आणि दक्षिण भारतातील डोमेस्टिक फ्लाइटबाबत कमी करण्यात आले आहेत. आता तिकीट १,८९९ रुपयांत उपलब्ध होतेय.

यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. पहिल्या पाच उत्तीर्णांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. 

दहशतवादी यासिन भटकळ कारागृहातून पळण्याच्या तयारीत

भारतविरोधी कारवाया करणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ कारागृहातून  पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. 

हेमा मालिनींना मुंबईत हलविणार

मथुरेहून जयपूरला जाताना झालेल्या अपघातात जखमी भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर हेमामालिनी यांना मुंबईत आणण्यात येणार आहे.