10

दिल्लीत एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक, वसुंधरा, सुषमा, शिवराज मुद्द्यावरून चर्चा

मोदींचं सरकार आल्यावर एनडीएचं अस्तित्वच धोक्यात आल्याची तक्रार शिवसेनेनं केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावलीय. मंगळवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. 

फ्राइड चिकन खाल्ल्यानं चीनी पुरुषात विकसित झालं स्तन

चीनमध्ये 26 वर्षीय युवकाचं स्तन विकसित झालंय आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'फ्राइड चिकन'मध्ये असलेल्या हार्मोन्समुळे त्याच्यात हा बदल झालाय. स्तन वाढत असल्यानं ली डॉक्टरांकडे गेला होता.

हो सोशल मीडियावर फिरणारे फोटो खरे! गोव्याच्या बीचवर 'मगर'

जर आपण गोव्याला फिरायला जायचा प्लान बनवत असाल तर ही बातमी नक्की वाचा... सध्या सोशल मीडियावर गोव्याच्या बीचवर मगर फिरत असल्याचा फोटो वायरल झालाय. हा फोटो खरा असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

अवघ्या १ रुपयांत विमानाचं तिकीट, स्पाइसजेटची मोबाईल अॅपवर ऑफर

बजेट एअरलाइन्स स्पाइसजेट आपल्या नव्या मोबाईल अॅपवर अवघ्या एक रुपयांत विमानाचं तिकीट उपलब्ध करून देतंय. काही ठराविक काळासाठी ही ऑफर आहे. यात भाड्यातील टॅक्स किंवा फीचा समावेश नाहीय. प्रवासी १५ जुलै ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत या तिकीटांवर प्रवास करू शकतो.

संशोधकांच्या संशोधनाचा उपयोग सामान्यांसाठी : केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन

संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेला व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न अधिक जोमाने सरू ठेवण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी गोव्यात दिली.

पाकिस्तानची पुन्हा पलटी, लक्वीच्या आवाजाचे नमुने घेणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीत २६/११ चा गुन्हेगार झकी उर रहमान लक्वी याच्या आवाजाचे नमुने देण्याचं कबूल केलंय. पण लक्वीच्या वकिलांनी मात्र नवाज शरीफ यांच्या आश्वासनाला छेद दिलाय.

आसाराम प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहचा मृत्यू

आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहवर शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आलंय. या खटल्यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ला झाला असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला.

इस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात

इस्त्रोने आज उत्तुंग यश संपादन केले. पाऊल पडते पुढे, याचा प्रत्यय इस्त्रोने दाखवून दिला. पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ हे अवकाशयान अवकाशात झेपावले आणि शास्त्रज्ञांनी आनंदोत्सव साजरा केला. इस्त्रोची ही सर्वात मोठी वाणिज्य मोहीम आहे.

रशियात सेल्फी काढण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू

रशियामध्ये सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणीनं आपला जीव गमावल्याची घटना घडलीय. एका पुलावरून ४० फूट खाली पडून तिचा मृत्यू झाला. 

फेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!

फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.