गुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार

गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. 

PTI | Updated: Aug 2, 2015, 09:23 AM IST
गुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार title=

नवी दिल्ली: गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. 

याच दरम्यान गुजरात आणि राजस्थानात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळं आलेल्या पुरानं आतापर्यंत ७० जणांचा बळी घेतला तर पश्‍चिम बंगालमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात या पावसानं अंदाजे चार लाख लोकांना बेघर केलं आहे. 

‘कोमेन’ वादळामुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं हवामान खात्यानं पूर्व भारतात शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.