10
10
टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
एकीकडे पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती सुरु असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला धमकी दिलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल.
शीना बोरा गूढ हत्या प्रकरणात पोलिसांना शनिवारी त्या कारचा शोध लागला, ज्यात शीनाची हत्या केली गेली. तर दुसरीकडे रायगड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी शीनाच्या अवशेषांवरून हत्या किंवा अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न निर्माण झालाय.
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला शनिवारी प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कमाल यांचे नाव एका मार्गाला देण्यात आले आहे.
वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं अमेरिकेत आपला प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनचं आव्हानं संपवत २०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. यावर्षीच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये बोल्टचं हे दुसरं गोल्ड आहे.
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-6चे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
गुवाहाटीला आज एका मॉडेला मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला. पोलीस उपायुक्त (मध्य) अमिताभ सिन्हा यांनी सांगितलं की, मॉडेल स्वीटी बरूआची हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा संशय आहे.
गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.